कोण आणि कोणत्या प्रकारची तक्रार दाखल करू शकता
- चुकीची माहिती
- भागपत्र
- सभासदत्व
- नामनिर्देशन
- भोगवटेतर शुल्काबाबत
- सदनिकेची मागणी केल्याबाबत
- दस्तऐवजाच्या प्रती न पुरविल्याबाबत
- संस्थेच्या अभिलेखामध्ये अनधिकृत बदल करणे, अभिलेख दडपून टाकणे अथवा नष्ट करणे
- देयके / कागदपत्रे न स्वीकारणे
- संस्थेचा देखभाल खर्च न भरणारा किंवा अपात्र सभासद
- अभिलेख व लेखापुस्तके जतन न करणे
- वार्षिक हिशेब आणि अहवाल न तयार करणे
- इतर संबंधित विषय
- चुकीची माहिती देऊन सोसायटीची नोंदणी
- भागपत्र न दिल्याबाबत
- सभासदत्व देण्यास नकार दिल्याबाबत
- संस्थेने नामनिर्देशन नोंदणी न केल्याबाबत.
- सदनिकेच्या हस्तांतरणासाठी जादा अधिमूल्याची मागणी केल्याबाबत
- सभासद निवडीसाठी निवडणुका न घेणे
- नामनिर्देशन फेटाळणे
- निर्धारित सर्वसाधारण सभा न बोलाविणे
- कार्यकारिणी समितीची बैठक आयोजित न करणे
- विवरणपत्रे न भरल्याने समितीने दिलेला राजीनामा
टीप : संबंधित सोसायटीचे सदस्य किंवा संभाव्य सदस्य तक्रार दाखल करू शकतात.
इतर तक्रारीसाठी कुठे जायचे
सहकारी न्यायालय (कलम ९१ अंतर्गत)
- १. कार्यकारिणी आणि सर्वसाधारण सभा यांचे ठराव
- २. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९०६ च्या कलम १५२ अ अन्वये तरतूद केल्याप्रमाणे नामनिर्देशन फेटाळण्यात आले असेल ते खेरीज करून व्यवस्थापन समितीच्या निवडणुकांबाबत
- ३. मोठी / दुरुस्ती अंतर्गत दुरुस्ती आणि गळती यांसह दुरुस्त्या
- ४. वाहने उभी करण्याची जागा
- ५. सदनिकांचे / भूखंडाचे वाटप
- ६. बांधकाम खर्चाच्या दरामध्ये वाढ होणे
- ७. विकासक / ठेकेदार, वास्तुशास्त्रज्ञ यांची नेमणूक
- ८. असमान पाणीपुरवठा
- ९. सभासदांकडील थकबाकीची जादा वसुली
दिवाणी न्यायालय
- १. बांधकाम व्यवसायी / विकासक यांनी / यांच्यात करारपत्रामध्ये दर्शविलेल्या अटी व शर्तीची पूर्तता न होणे.
- २. दुय्यम दर्जाचे बांधकाम
- ३. संस्थेच्या नावे मालमत्तेचे अभिहस्तांतरण पत्र
- ४. बांधकाम दरामध्ये वाढ होणे
महानगरपालिका/ स्थानिक स्वराज्य संस्था
- १. बेकायदेशीर बांधकाम जादा / पर्यायी बांधकाम बांधकाम व्यवसायी / सभासद/ सदनिकेचा भोगवटादार यांच्याकडून करण्यात आलेले
- २. संस्थेला व सभासदांना होणारा अनियमित पाणीपुरवठा
- ३. सभासदाकडून / भोगवटादाराकडून वापरामध्ये बदल
- ४. इमारतीचे संरचना विषयक प्रश्न
- ५. महापालिका / स्थानिक प्राधिकरण यांच्या कार्यकक्षेत येणाऱ्या बाबी. उदा. मालमत्ता कर, रस्त्यावरील दिवे कचरा आणि इत्यादी नागरी सुविधा
पोलीस
- १. सभासद / बांधकाम व्यवसायी / भोगवटादार किंवा कोणतीही अन्य व्यक्ती यांच्याकडून सदनिका, दुकान, वाहन उभी करण्याची जागा / मोकळी जागा याचा अनधिकृत वापर करुन होणारा उपद्रव
- २. संस्थेच्या सभासदाने अथवा सभासदांना धमकी देणे / त्यांच्यावर हल्ला करणे
सर्वसाधारण सभा
- १. संस्थेच्या मालमत्तेची देखभाल व्यवस्थापन समितीकडून न होणे
- २. संस्थेच्या दर्शनी भागावर फलक न लावणे
- ३. संस्थेच्या सभासदाकडून उपविधी मधील तरतुदीचे पालन न झाल्यामुळे अशा कृतीसाठी व्यवस्थापन समितीने आकारलेला जादा दंड
- ४. उपलब्ध मोकळया जागेचा कायदेशीर वापर करण्यास व्यवस्थापन समितीचा विरोध
- ५. व्यवस्थापन समितीकडून संस्थेच्या मालमत्तेचा विमा न काढणे
- ६. वास्तुशास्त्रज्ञाची नेमणूक
महासंघ जिल्हा /राज्य
- १. सभासदांनी संस्थेच्या कार्यकारिणीतील सचिवास प्रवेश नाकारणे
- २. सभासद / व्यवस्थापन समिती यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार न स्वीकारणे
- ३. संबंधित जिल्हा / सहाय्यक निबंधकांनी दिलेल्या निर्देशानुसार उपविधी क्र. ९७ अन्वये विशेष सर्वसाधारण सभा बोलाविणे आणि उपविधी क्र. १३३ अन्वये व्यवस्थापन समितीची सभा बोलविणे