तक्रार निवारण मार्गदर्शक तत्त्वे
महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट्स महासंघ अंतर्गत नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थांशी संबंधित तक्रारींचे निराकरण करण्यासाठी “सहकार संवाद” पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे. तुमची तक्रार दाखल करण्यापूर्वी खालील मार्गदर्शक तत्त्वे काळजीपूर्वक पहा जेणेकरून तक्रार निवारणाची प्रक्रिया सुरळीत होईल:
तक्रारदाराची पात्रता: सहकारी गृहनिर्माण संस्थांचे सभासद अथवा भावी सभासद असणारे या पोर्टलवर तक्रारी दाखल करण्यास पात्र आहेत. तुमची तक्रार सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निबंधकांच्या अखत्यारीत येणाऱ्या प्रकरणांशी संबंधित असल्याची खात्री करुन घ्या.
तक्रार दाखल करणे: तक्रार दाखल करण्यासाठी "तक्रारीची नोंद करा" यावर क्लिक करा. तुमच्या तक्रारीबाबत अचूक आणि संक्षिप्त माहिती द्या ( कमाल मर्यादा २०० शब्द). तुमच्या तक्रारीशी संबंधित दस्तऐवज अपलोड करा. (फाईल अपलोड साईझ १MB कमाल मर्यादा)
तक्रार निवारण प्रक्रिया: दाखल झालेली तक्रार संबंधित सह/उप/सहकारी निबंधक यांच्याकडे कारवाई आणि निराकरणासाठी निर्देशित केली जाईल. वेळेवर कारवाई व्हावी यासाठी वेळोवेळी संबंधित अधिकारी यंत्रणेकडून सर्व तक्रारींचा आढावा घेतला जाईल आणि पाठपुरावा केला जाईल.
तक्रारीचा आढावा: तक्रारनिवारणाच्या प्रक्रियेची प्रगतीचे निरीक्षण पाहण्यासाठी " तुमच्या तक्रारीचा आढावा घ्या" ह्या लिंकवर क्लिक करा. संबंधित अधिकार्यांनी घेतलेल्या निर्णयांची माहिती तुम्हाला पाहता येईल.
शुल्क आणि आणि त्याचा उपयोग: प्रत्येक तक्रार दाखल करण्यासाठी नाममात्र शुल्क ₹५०/- लागू आहे. सभासदांकडून वसूल केलेले शुल्क पोर्टलच्या देखभाल आणि अद्ययावतीकरणासाठी आणि केवळ सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या सदस्यांना प्रशिक्षण आणि शिक्षण देण्यासाठी वापरले जाईल.
संपर्क: तक्रार निवारण प्रक्रियेशी संबंधित कोणत्याही सहाय्यासाठी किंवा शंकांसाठी, आमच्या हेल्प डेस्कशी संपर्क साधा.
सभासदांचे हित केन्द्रस्थानी ठेवून एक पारदर्शी तक्रार निवारण प्रणालीचे संवर्धन करण्यासाठी महासंघ वचनबद्ध आहे. आपण सर्व एकत्र मिळून उज्वल भविष्यासाठी एक चांगला सहकारी समुदाय तयार करूया. सहकार्याबद्दल धन्यवाद!