तक्रार निवारण प्रक्रिया:

सभासद आपल्या तक्रारी त्यांच्या सोसायटीमधल्या कोणत्याही पदाधिकाऱ्याकडे लेखी अर्जाद्वारे सादर करू शकतो. तक्रार अर्ज आल्यानंतर सोसायटीमधील समिती लगेचच होणा-या पुढच्या बैठकीमध्ये त्यावर निर्णय घेईल व त्यानंतर १५ दिवसांत तो निर्णय संबंधित सदस्याला कळवला जाईल.

समितीने दिलेल्या निर्णयावर संबंधित सभासदाचे समाधान झाले नसेल किंवा समितीने या संदर्भात १५ दिवसांच्या आत संपर्क साधला नसेल, तर समितीचा सदस्य वार्षिक सर्वसाधारण सभेने स्थापन केलेल्या तक्रार निवारण समितीकडे ही तक्रार नेऊ शकतो. जर सभासदाला ह्या समितीतील पदाधिकारी आणि आणि समितीच्या अधिकारांबद्दल आक्षेप असेल, तर तक्रारदार सदस्य तक्रारीच्या स्वरूपानुसार संबंधित सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकतो.

निबंधकांकडील तक्रारी / विषय

  • चुकीच्या माहितीच्या आधारे सोसायटीची नोंदणी
  • भागपत्र किंवा शेअर सर्टिफिकेट निर्गमित न केल्याबाबत
  • सदस्यत्वास नकार दिल्याबाबत
  • संस्थेकडून नामनिर्देशन नोंदणी न केल्याबाबत.
  • भोगवटेतर शुल्काबाबत
  • हस्तांतरणासाठी जादा अधिमूल्याची किंवा रकमेची मागणी केल्याबाबत
  • अभिलेखाच्या आणि दस्तऐवजाच्या प्रती न पुरविल्याबाबत
  • "संस्थेच्या अभिलेखामध्ये अनधिकृत बदल, तो दडपून टाकणे अथवा नष्ट करणे याबाबत."
  • "समितीने धनादेश अथवा कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार न स्वीकारणे याबाबत"
  • "संस्थेचे अभिलेख व लेखापुस्तके न ठेवणे अथवा अर्धवट अवस्थेत ठेवणे याबाबत."
  • "विहित कालावधीत संस्थेचे वार्षिक हिशेब आणि अहवाल तयार न करणे याबाबत."
  • संस्थेच्या निधीचा चुकीचा विनियोग अथवा निधी बाबत अफरातफर करणे याबाबत.
  • संस्थेचा कसुरदार/ निरर्ह सदस्या बाबत
  • संस्थेच्या निधीची सर्वसाधारण सभेच्या पूर्व संमतीशिवाय गुंतवणूक करणे याबाबत
  • हिशोबांचा मेळ बसविणे याबाबत.
  • लेखापरीक्षा , लेखापरीक्षा दुरुस्ती अहवाल याबाबत.
  • समितीची मुदत संपण्याअगोदर कायद्यानुसार निवडणुका न घेण्याबाबत.
  • नामनिर्देशन फेटाळण्याबाबत.
  • विहित कालावधीत किंवा प्रत्येक वर्षी 30 सप्टेंबरपूर्वी सर्वसाधारण सभा न बोलाविणेबाबत.
  • उपविधी मध्ये दर्शविल्याप्रमाणे समितीची बैठक आयोजित न करण्याबाबत
  • समितीने दिलेल्या राजीनाम्याबाबत
  • निबंधकाच्या अखत्यारीतील इतर संबंधित विषय याबाबत

सभासदांकडून ऑनलाइन तक्रार अर्ज दाखल झाल्यानंतर तो अर्ज संबंधित सहकारी संस्थांच्या उप/सहाय्यक निबंधकांकडे कारवाई आणि निराकरणासाठी पाठवला जाईल. वेळेवर कार्यवाही करण्यासाठी संबंधित अधिकारी यंत्रणा सर्व तक्रारींचा पाठपुरावा करत राहील.

"Track Your Complaint” चा वापर करून आपण आपल्या तक्रारीबाबत पुढे काय कार्यवाही झाली हे पाहू शकतो. यामध्ये आपल्या तक्रारी बाबत अधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाबाबत आपल्याला ऑनलाईन माहिती मिळते.

प्रत्येक तक्रार अर्ज दाखल करण्यासाठी ₹५0 नाममात्र शुल्क लागू आहॆ. सभासदांकडून वसूल केलेले शुल्क पोर्टलच्या देखभाल आणि अद्ययावतीकरणासाठी आणि केवळ सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या सदस्यांना प्रशिक्षण आणि शिक्षण देण्यासाठी वापरले जाईल.